तुळशीवाडी पालिका वसाहतीतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचे घर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2013

तुळशीवाडी पालिका वसाहतीतील सफाई कामगारांना मिळणार हक्काचे घर

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे 'डी' विभागातील तुळशीवाडी महापालिका सफाई कामगार वसाहतीचा पुनर्विकास होऊन येथे राहणार्‍या ७२४ सफाई कामगारांना मालकी हक्काची मोफत घरे मिळणार आहेत.

तुळशीवाडी येथील महापालिका वसाहत अतिशय मोडकळीस आलेली व दुरवस्थेत होती. सफाई कामगारांचे कामाचे स्वरूप आणि जीर्णावस्थेत असलेल्या जागेत राहण्याची त्यांची जीवनशैली पाहिल्यानंतर या वसाहतीच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यासाठी दक्षिण मुंबईतील खासदार मिलिंद देवरा तसेच पालिकेतील विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी सतत प्रयत्न केले. येथील सफाई कामगारांना मालकी हक्क तत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्याकरिता राज्य शासन आणि पालिका प्रशासनाकडे कोणतीही योजना अस्तित्वात नसताना देवरा आणि निकम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले पाठपुराव्यामुळे ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यासाठी शासनाकडून पालिका प्रशासनास निर्देश देण्यात आले. त्यामुळे सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

या योजनेनुसार तुळशीवाडी पालिका सफाई कामगार वसाहतीचा पुनर्विकास होणार असून, पालिकेला १0८६ अतिरिक्त सेवा निवासस्थाने प्राप्त होणार आहेत. तसेच जिमखाना, वेल्फेअर सेंटर, कम्युनिटी हॉल, दुकाने, वाचनालय, मंदिर इत्यादी आवश्यक सुविधाही मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad