आनंदराज म्हणतात, अध्यक्ष मीच ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2013

आनंदराज म्हणतात, अध्यक्ष मीच !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ताबा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी घेतला. सर्व विश्वस्तांचा आपल्या पाठिंबा असून कायदेशीरपणे संस्थेचा मीच अध्यक्ष आहे, असा दावा त्यांनी केला. 

इंदू मिलच्या जागेवर स्मारकाचे काम सुरू करावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेतर्फे सोमवारी आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते हुतात्मा चौकातील सिद्धार्थ महाविद्यालयातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. संस्थेचे उपाध्यक्ष व्ही. एम. प्रधान यांनी आनंदराज यांचे स्वागत केले. तसेच त्यांना अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. या वेळी आंबेडकर यांच्यासोबत दोनशे कार्यकर्ते होते. ही माहिती कळताच मोठय़ा फौजफाट्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी सिद्धार्थ महाविद्यालत पोहोचले. 3 जून रोजी अँड. प्रकाश आंबेडकर संस्थेच्या कार्यालयात जात असताना त्यांना रोखण्यात आले होते. त्या वेळी आठवले आणि आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली होती. 4 सप्टेंबर 2012 रोजी संस्थेत मोठा कार्यक्रम घेऊन रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे होती घेतली होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad