मुंबई : पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने नालेसफाई तसेच रस्त्याची कामे हाती घेतली. असे असले तरीही पूर्व उपनगरातील तब्बल ११७ रस्त्यांची कामे रखडली आहेत. या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामावर अतिरिक्त १00 कोटी रुपये खर्च वाढणार असल्याने याबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून स्थायी समितीची बैठक तहकूब केली. पावसाळा तोंडावर आला असताना तसेच रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असताना महापौरांसह स्थायी समितीच्या सदस्यांनी शांघायचा दौरा आयोजित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, आता तर रस्त्यांची आकडेवारीच समोर आल्याने या प्रकरणी मुंबई महानगरपालिका कशाप्रकारे वेगाने काम करते याकडेच आता तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले आहे. मंबई महानगरपालिकेने पूर्व उपनगरातील ११७ रस्ते बनवण्याचे कंत्राट जे कुमार या ठेकेदाराला देण्याचा निर्णय घेतला, मात्र या ठेकेदाराने सादर केलेली कागदपत्रे बोगस असल्याचा आरोप करत निविदा प्रक्रियेतील सहभागी कंत्राटदार महावीर कन्स्ट्रक्शनने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने जे कुमारचे कंत्राट रद्द केले. परिणामी, पालिकेने निविदा प्रक्रियेतील आणखी एका कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा घाट घातला होता. याला भाजपाचे मनोज कोटक आणि सभागृह नेते यशोधर फणसे यांनी विरोध केला. या घटनेत अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांचा अहंपणा कारणीभूत ठरल्याचा तसेच रस्त्यांच्या कामाबाबत अधिकारी आणि आयुक्त तसेच कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोपही कोटक यांनी केला. अतिरिक्त आयुक्तांच्या अहंपणामुळे आणि मनमानीपणामुळे ११७ रस्त्यांची कामे रखडली आणि आता रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामावर अतिरिक्त १00 कोटींचा खर्च वाढला, असे सांगून हा भुर्दंड जनतेने का सोसायचा? असा सवाल फणसे यांनी केला. तसेच या घटनेचा निषेध करून कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब करण्याची मागणी केली. |
Post Top Ad
05 June 2013
Home
Unlabelled
स्थायी समितीची बैठक तहकूब / ११७ रस्त्यांची कामे रखडली
स्थायी समितीची बैठक तहकूब / ११७ रस्त्यांची कामे रखडली
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment