शीतल साठे यांना जामीन मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2013

शीतल साठे यांना जामीन मंजूर

नक्षलवाद्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्या शीतल साठे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मानवतेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी जामीन मंजूर केला. शीतल साठे या सध्या गर्भवती असून, पुढील महिन्यात त्यांची प्रसुती नियोजित आहे.

जूनच्या सुरुवातीला सत्र न्यायालयाने साठे यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयात त्यांच्या जामीनाला सरकारी पक्षाने विरोध न केल्याने ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. गेल्या दोन एप्रिलला शीतल साठे यांनी मुंबईत पोलिसांपुढे शरणागती पत्करली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्या भूमिगत होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad