मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या १८ जूनपासून २0 जूनपर्यंत बेस्टचे कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत. बेस्टच्या कर्मचार्यांनी काम बंद आंदोलनात सहभागी होऊ नये, तसेच औद्योगिक न्यायालयाने (यूएलपी) दिलेल्या आदेशान्वये बेस्ट वर्कर्स युनियनला कर्मचार्यांना कामावर येण्यापासून परावृत्त करणे आणि प्रवासी जनतेला वाहतूक सेवेपासून वंचित ठेवण्यास मनाई आहे. अन्यथा संपात सहभागी होणार्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने आपल्या पत्रात म्हटले आहे.
|
बेस्ट कर्मचार्यांच्या वेतन कराराची थकबाकी, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, महापालिका कर्मचारी-अधिकार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि रिक्षाचालक ांना १ मेपासूनची भाडेवाढ लागू करावी, अशा अनेक मागण्यांसाठी येत्या १८ जूनपासून ऑटो, बेस्ट, पालिका आणि फे रीवाले संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडणार असून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने एक पत्रक जारी करून बेस्ट उपक्रमातर्फे कर्मचार्यांनी आपापल्या कामावर १८ जून रोजी उपस्थित राहावे अन्यथा संबंधित कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल आणि औद्योगिक न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी युनियनवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
No comments:
Post a Comment