पालिका शाळेतील वर्गखोल्यांचा गैरवापर करणार्‍यांना नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2013

पालिका शाळेतील वर्गखोल्यांचा गैरवापर करणार्‍यांना नोटीस

मुंबई : मनपाच्या शाळांतील वर्गखोल्यांचा राजकीय पक्ष, कामगार संघटना, व्यावसायिक क्लासेस या अशैक्षणिक कामासाठी वापर करणार्‍या व लाखो रुपयांचे वीज बिल थकविणार्‍या एकूण ६२५ अशासकीय संस्थांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अशासकीय संस्थांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रॅण्ट रोड येथील गिल्डर नेल येथील पालिका शाळेच्या काही वर्गखोल्यांच वापर ११ अशासकीय संस्था, तीन खाजगी कॉलेज करत आहेत. या शाळेचे १0 लाखांचे वीज देयकही थकीत आहे. यामध्ये हमारा फाऊंडेशन या संस्थेने ८३ हजार १८३ रुपये वीज देयक भरायचे आहे.पालिकेने या संस्थांना वीज देयके भरण्याच्या नोटीस दिल्या आहेत.

तसेच अक्षैणिक कामांसाठी वर्गखोल्यांचा वापर करणार्‍या संस्थांकडून पालिकेला अत्यल्प उत्पन मिळते. तर या अशासकीय संस्था भरघोस पैसे कमवतात. त्यामुळे अशा संस्थांकडून वर्गखोल्या त्वरित ताब्यात घ्याव्यात, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मनोज कोटक यांनी दिले आहेत. त्यानुसार आता कारवाईला सुरुवात झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad