कॅन्सर फाऊंडेशनचा वर्धापन दिन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 June 2013

कॅन्सर फाऊंडेशनचा वर्धापन दिन

मुंबई : कॅन्सर अँण्ड रिसर्च फाऊंडेशनचा १२वा वर्धापन दिन शुक्रवार, २१ जून रोजी सायंकाळी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या वेळी डॉक्टर ए. ए. काजी, डॉक्टर राज तेंडुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २00१ साली कॅन्सर फाऊंडेशन अँण्ड रिसर्च सेंटर या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेकडून ६५0८ कॅन्सरग्रस्तांना १३ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मदतीला आलेल्या कॅन्सरग्रस्ताला या संस्थेची मदत डोळेझाकपणे मिळत असल्याचे अनेक मदत घेणार्‍यांनी म्हटले आहे. २0 जून रोजी या संस्थेच्या वर्धापन दिनी कॅन्सरग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर, रुग्ण याबरोबरच अनेक समाजसेवी, कलावंत उपस्थित राहणार असून, या वेळी होणार्‍या मनोरंजनात्मक कार्यक्रमाबरोबरच कॅन्सरशी कसा सामना करायचा, त्याच्यापासून कसा बचाव करायचा, यावर जाणकारांचा परिसंवाद होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad