बेस्टचे प्रवाशांना आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2013

बेस्टचे प्रवाशांना आवाहन

मुंबई : बेस्टने पावसाळ्याच्या काळात प्रवाशांना विशेष आवाहन केले आहे. प्रवासादरम्यान रेनकोट आणि विण्डचिटरमुळे सहप्रवाशांना त्रास होऊ नये, असे बेस्टने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पावसाळ्यात रेनकोट, विण्डचिटर परिधान करून प्रवासी बसमध्ये प्रवेश करतात. मात्र बसमध्ये आसनावर प्रवास करताना किंवा उभ्या स्थितीत अंगावरील ओल्या कपड्यामुळे सहप्रवाशांचे कपडे ओले होतात. तसेच वातानुकूलित बसगाड्यांमधील आच्छांदनेही यामुळे खराब होण्याची शक्यता असते. या परिस्थितीत सहप्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून प्रवाशांनी रेनकोट किंवा विण्डचिटर प्रवासादरम्यान काढून घडी करून ठेवावेत, असे आवाहन बेस्टने केले आहे.
     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad