फेसबुक वरून बाबासाहेब आंबेडकर यांचा संदीप अग्रवाल नामक युवकाकडून अवमान केल्याची घटना मागील आठवड्यात २९ मे ला आंबेडकरी जनतेच्या निदर्शनास आली होती. बाबासाहेबांचा अवमान झाल्याचे समजताच रिपब्लिकन सेनेच्या चेंबूर येथील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवताच दैनिक जनतेचा महानायक ने याप्रकाराला प्रसिद्धी देताच आंबेडकरी जनतेमध्ये अवमान करणाऱ्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरली होती.
चेंबूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाल्यावर अवमान करणाऱ्या अग्रवाल याला अटक करावी अशी मागणी सतत केली जात आहे. अग्रवाल याला अटक केली जावी अशी मागणी केली जात असतानाच पोलिस त्वरीत कारवाही करण्यास कमी पडत असतानाच अग्रवाल ने भगवान बुद्ध यांचाही अवमान केला आणि आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाने पेट घेण्यास सुरुवात केली. वडाळा, एलफिस्टन येथे आंदोलन करण्यात आली, चेम्बुर येथील लाल डोंगर, घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर इत्यादी विभागामध्ये तीव्र आंदोलन करून सदर विभागांमध्ये कडकडीत बंदही पाळला गेला. पुणे, नागपूर इत्यादी ठिकाणीही आंदोलने करण्यात आली आहेत.
घाटकोपर रमाबाई नगर येथे भारिप बहुजन महासंघ, आरपीआय आठवले गट, रिपब्लिकन सेना इत्यादी संघटना एकत्र एवुन बंद पाळला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर रास्तारोको केल्याने जवळच असलेल्या कामराज नगर, नालंदा या विभागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतनगर पोलिस ठाण्यामध्ये निवेदन देवून संदीप अग्रवाल याला त्वरित अटक करण्याची मागणी केली. चेंबूर आरसीएफ येथे बुद्ध विहार ते चेंबूर नाका, आशिष थियेटर परिसरात आरपीआय आठवले गटाच्या वतीने निषेध करत निदर्शने करून दुकाने बंद करण्यात आली. यावेळी संदीप अग्रवाल नामक व्यक्तीला येत्या २४ तासात अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा तसेच वेळ पडल्यास मुंबई बंद करण्याचा इशारा दिला होता.
मुंबई मध्ये आंदोलन होत असताना सरकारने किवा पोलिसांनी ज्या प्रकारे परिस्थिती हाताळायला हवी होती तशी परिस्थिती हाताळण्यात आली नाही. बाबासाहेबांचा अवमान झाला कि सर्वत्र आंदोलन पेट घेते याच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे २४ तासात अवमानना करणाऱ्यावर कारवाही करू असे स्पष्ट लेखी उत्तर सायबर क्रांइम विभागाने चेंबूर पोलिस ठाण्याला देवूनही त्या २४ तासात कारवाही केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर क्रांइम विभागाकडे तक्रार केल्यावर त्वरित कारवाही झाली असती तरमुंबई मध्ये दोन दिवस आंदोलन करण्याचीही आंबेडकरी जनतेला आवश्यकता झाली नसती.
एकीकडे पोलिसांनी अवमान करणाऱ्या अग्रवालची फेसबुक वरील लिंक शुक्रवारी संध्याकाळी बंद केली असली तरी संदीप अग्रवाल नामक व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. बाबासाहेब आंबेडकर किवा इतर कित्तेक राष्ट्र पुरुषांचा अवमान या फेसबुक वरून कित्तेक वेळा झाला आहे. संबंधित अवमान करणारयाची लिंक बंद करणे, पेज लोकांना दिसू न देणे एवढे काम केले कि आपले काम झाले असे समजून पोलिस आता पर्यंत काम करत आले आहेत. पोलिसांनी अशा अवमान करणाऱ्या एकाही व्यक्तीला पोलिसांनी अटक करून कारवाही केलेली नाही. हे गुन्हे अन्वेश्नात जगात दुसरा क्रमांक असलेल्या मुंबई पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल.
कोणत्याही महापुरुषांचा अवमानना झाल्यावर जितके आंदोलन तीव्र होते त्यापेक्षा कित्तेक पतीने आंबेडकरी जनतेचे आंदोलन तीव्र असते. हे पोलिसांना माहित असूनही पोलिसांनी कारवाही करण्यास इतका वेळ का लावला, आंबेडकरांचा अवमान झाला असताना आंबेडकरी जनतेचे नेते म्हणवून स्वताची पोळी भाजणारे नेते गप्प का बसले होते, एकाही नेत्याने प्रतिक्रिया का दिली नाही, या नेत्यांना असा प्रकार होणार आहे हे माहित होते का, असे कित्तेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची आंबेडकरी जनतेला उत्तर शोधण्याची गरज आहे. हा अवमान करण्याचा प्रकार म्हणजे दंगल घडवण्याचा प्रकार होता का या दृष्टीने तपास करण्याचीही गरज आहे.
पोलिसांकडून जर कारवाही करण्यास वेळ लागत होता आणि ठीक ठिकाणी आंदोलने होत होती अशावेळी राज्य सरकारनेसुद्धा कोणतेही कारवाही करण्याबाबत आदेश दिलेले दिसत नाही. बेधडक व चांगले गृहमंत्री अशी ओळख असलेल्या आर. आर. पाटील हेसुद्धा आपल्या पोलिसांना ताबडतोब कारवाही करण्याचे आदेश देण्याचे सोडून गप्प का बसले असा प्रश्न सध्या आंबेडकरी जनतेमधून विचारला जात आहे.
हा सगळा प्रकार म्हणजे लवकरच लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दंगल घडवण्याचे हे षड्यंत्र असू शकते. असे अवमानना झाल्याचे प्रकार पुढेही होऊ शकतात यामुळे आंबेडकरी जनतेने जागृत राहण्याची, कुठेही दंगल होणार नाही याची दखल आंबेडकरी जनतेने घेण्याची गरज आहे. असे अवमानना झाल्याचे प्रकार झाल्यावर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून अवमान करणाऱ्यावर कारवाही करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. 09969191363
No comments:
Post a Comment