जियाच्या आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2013

जियाच्या आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीला अटक

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आणि जियाचा प्रियकर सुरज याला मुंबई पोलिसांनी सोमवारी अटक केली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका सुरज पांचोलीवर ठेवण्यात आलाय.

सुरजसोबतच्या प्रेमसंबंधातील तणावामुळेच अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असा जियाच्या कुटुंबीयांचा दावा आहे. प्रेमसंबंध आणि त्यातील तणावाबद्दल जियाने काही दिवसांपूर्वी लिहिलेले सहापानी पत्र जियाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिले. पत्रामध्ये थेटपणे सुरजचा उल्लेख नसला, तरी ती व्यक्ती सुरजचं असल्याचा दावा जियाच्या कुटुंबीयांनी केलाय. 


सुरज आणि जियामध्ये शारीरिक संबंध आले होते आणि जियाने गर्भपातही केला होता, अशी माहिती पत्रातून स्पष्ट होते असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे मत होते. सुरजला सोमवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी जुहूतील पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad