मुंबई पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2013

मुंबई पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल

मुंबई : मुंबई पोलीस दलात येत्या काही दिवसांत मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलीस आयुक्तपदी जावेद अहमद यांची निवड जवळजवळ पक्की मानली जात असून ते येत्या एक-दोन दिवसांत आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे कळते. जावेद अहमद आयुक्तपदावर येणार असल्याबाबतचे पहिले वृत्त दै. 'पुण्य नगरी'ने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. आयुक्तांबरोबरच आता दलात मोठे बदल होणार, असे विश्‍वसनीय सूत्राने सांगितले. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त हिमांशू रॉय यांना या पदावर चार वर्षे पूर्ण झाली असल्याने त्यांना पदोन्नती दिली जाणार असल्याचे कळते. रॉय यांच्या जागेवर येण्यासाठी डॉ. परमवीर सिंग व देवेन भारती यांच्यात मोठी स्पर्धा आहे. परमवीर सिंग यांच्यासाठी शहरातील मोठय़ा बिल्डरांची लॉबी प्रयत्न करीत असून भारती यांच्यासाठी खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील जोर लावत आहेत. 

परमवीर यांच्या नावाला राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांचा प्रारंभी विरोध होता, पण आता हा विरोध मावळल्याने त्यांचे पारडे काहीसे जड झाले आहे. सध्या गुन्हा विभागात अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करणारे निकेत कौशिक यांना सहआयुक्तपदी बढती मिळणार असल्याने त्यांचाही डोळा रॉय यांच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. पण कौशिक यांच्या पत्नीचे नाव 'आदर्श' घोटाळ्यामध्ये आल्यामुळे त्यांची बाजू काहीशी कमकुवत झाली आहे. इच्छुक अधिकार्‍यांमध्ये कमालीची स्पर्धा लागली असून आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांची मोक्याच्या जागी वर्णी लागण्यासाठी बडी बिल्डर लॉबी मैदानात उतरली आहे. सीबीआयचे सहसंचालक लक्ष्मी नारायण यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने ते केव्हाही राज्य पोलीस दलाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. अत्यंत हुशार व स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी म्हणून लक्ष्मी नारायण पोलीस दलात ओळखले जातात. कदाचित त्यांचीही वर्णी गुन्हे अन्वेषण विभागात लागण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ते विश्‍वासातील आहेत. 

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांना जेमतेम काही महिन्यांचा कालावधी उरला असताना राज्यातील लोकशाही आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे कळते. या तयारीचाच एक भाग म्हणून आयुक्तपदावर जावेद अहमद यांची नियुक्ती केली. केवळ चार महिन्यांचा आयुक्तपदाचा कालावधी त्यांना मिळणार असला तरी मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी काँग्रेसने ही चाल खेळल्याची चर्चा दलात चालू आहे. जावेद अहमद यांच्यानंतर विजय कांबळे यांची आयुक्तपदावर नियुक्ती करून दलित समाजालाही आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार, असे बोलले जाते. काँग्रेस पक्षाच्या या चालीचा फटका गृहमंत्रीपद भूषविणार्‍या राष्ट्रवादी पक्षाला बसणार असून त्यांच्या पसंतीच्या अधिकार्‍यांवर मात्र अन्याय होत असल्याची चर्चा आता पक्षाचे नेते उघडपणे करू लागले आहेत.

कौशिक यांच्या जागेवर येण्यासाठी पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्‍वास नागरे-पाटील तयार असून कदाचित त्यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारली जात नाही. तसे झाल्यास नागरे-पाटील यांच्या जागेवर ब्रिजेश सिंग यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची पदे मिळविण्यासाठी सध्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad