मुंबई : मुंबई महानगरपालिकेने नुकतीच मालमत्ता करात वाढ केली, तर आता पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्तावही मुंबई महानगरपालिकेने समोर ठेवला. त्यानुसार, सोमवारपासून मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचेच पाणी पळणार आहे. दरम्यान, मुंबईकरांवर होणार्या ८ टक्के पाणी दरवाढीला विरोध करण्यासाठी तसेच या दरवाढीबाबत प्रशासनाने फेरविचार करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे एक पथक सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे
शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे ६ जिल्हाध्यक्ष, ३६ तालुका अध्यक्ष, पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित राहाणार असल्याचे पिसाळ यांनी सांगितले. दरम्यान, स्थायी समितीत या प्रस्तावावर सोमवारी सकाळी चर्चा होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भेटीतून काय निष्पन्न होणार याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. सोमवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी दरवाढीचा मंजूर प्रस्ताव माहितीसाठी सादर होणार असून याबाबत बैठकीत काय चर्चा होते याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष्य लागले आहे. मात्र यापूर्वीच या दरवाढीस मंजुरी दिली असल्यामुळे दरवाढ मागे घेणे अशक्य असून स्थायी समिती अध्यक्षांनी दरवाढ मागे घेणयाबाबत दिलेले पत्रच चुकीचे असल्याचे भाजपाच्या पालिकेतील नेत्याने सांगितले. हा दरवाढीचा प्रस्ताव केवळ माहितीसाठी असल्याने सोमवारच्या बैठकीत परिस्थिती पाहून आमचे धोरण ठरवू, असेही या नेत्याने सांगितले.
स्थायी समितीच्या ९ मे २0१२च्या ठराव क्रमांकानुसार सन २0१२-१३च्या अर्थसंकल्पाची मांडणी करताना उचल आणि खर्च यामध्ये असलेली तूट भरून काढण्यासाठी तसेच सर्वसाधारण दरवाढीबरोबरच आस्थापना, प्रशासकीय, प्रचालन आणि परीक्षण तसेच शासकीय धरणांतून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या प्रत्यक्ष वाढीच्या प्रमाणात प्रतीवर्षी ८ टक्के जलाकार दरात वाढ करण्याच्या प्रशासनाकडून सादर झालेल्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. या वेळी राष्ट्रवादीने जोरदार विरोध प्रदर्शन केल्यानंतरही बहुमताच्या जोरावर सत्ताधार्यांकडून या दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र राष्ट्रवादीकडून या दरवाढीस विरोध केला जात असून पिसाळ यांच्या म्हणण्यानुसार ३१ मे २0१३ पर्यंत २९ हजार ९४३ कोटींच्या मुदतठेवीवर पालिकेला दरमहा सुमारे २५0 रुपये व्याज मिळत असताना ८ टक्के पाणी दरवाढीतून मिळणार्या २१ कोटी १६ लाख रुपयांच्या महसुलासाठी वाढ करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
होणारी पाणी दरवाढ
१000 लिटरमागे १५ जूनपर्यंत आजपासून
घरगुती ग्राहक ३ रुपये ३.२४ रुपये
इतर घरगुती ग्राहक ४ रुपये ४.३२ रुपये
बिगर व्यापारी संस्था १६ रुपये १७.२८ रुपये
व्यावसायिक संस्था ३0 रुपये ३२.४0 रुपये
उद्योगधंदे/कारखाने ४0 रुपये ४३.२0 रुपये
तारांकीत हॉटेल ६0 रुपये ६४.८0 रुपये

No comments:
Post a Comment