रविवारपासून संततधार कोसळणार्या पावसाने मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक स्थिर होत असतानाच मंगळवारी ठाणे आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलच्या पेण्टाग्राफमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. धिम्या मार्गावर अचानक ही गाडी बंद पडल्याने या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या. दरम्यान, ठाण्याकडून कल्याणकडे जाणार्या उपनगरी गाड्यांचे वेळापत्रक काही वेळ कोलमडले, तर लोकल बिघाडामुळे प्रवाशांना मात्र ऐन पावसात रेल्वे रुळांवरून पायपीट करावी लागली. अखेर ही गाडी दुरुस्तीसाठी कळवा कारशेडला हलवण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे-बदलापूर ही उपनगरीय गाडी दुपारी ४ वाजून २0 मिनिटांनी सुटते. ती गाडी ठाण्याच्या पुढे गेल्यानंतर गाडीच्या पेण्टाग्राफमध्ये बिघाड झाल्याने जागेवरच बंद पडली, मात्र त्यानंतर कशीबशी ती गाडी चालू करण्यात आली, मात्र त्यानंतर पुन्हा कळवा रेल्वे स्थानक येण्यापूर्वीच ती लोकल पुन्हा बंद पडली. त्यामुळे मागून येणार्या तीन लोकल एकामागून एक खोळंबल्या. लोकलच्या या बिघाडामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आठवड्याचा दुसराच दिवस असल्याने आणि त्यात चाकरमान्यांची कामावरून सुटण्याची वेळ असल्याने घरी परतणार्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला. |
Post Top Ad
12 June 2013
Home
Unlabelled
पेण्टाग्राफ बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
पेण्टाग्राफ बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment