नालेसफाईसाठी मनसेकडून पालिका प्रशासनाला इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2013

नालेसफाईसाठी मनसेकडून पालिका प्रशासनाला इशारा

मुंबई : मुंबईत रविवार आणि सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. यावरून पालिका प्रशासनाने बोध घेऊन वेळीच जागे होऊन नालेसफाईची कामे पूर्ण करावीत; अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने या सुस्त प्रशासनाला जागे करेल, असा इशारा पालिकेतील मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला.

यंदा वरुण राजाने ठरलेल्या वेळी मुंबईत आगमन करत पालिका प्रशासनासह सत्ताधारी पक्षाला खडबडून जागे केले. प्रशासनाकडून ६ जूनपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण केली जातील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र प्रशासनाचे तसेच सत्ताधार्‍यांचे हे दावे फोल ठरले असून पहिल्या दोन दिवसांच्या पावसाने हे स्पष्ट केले. प्रशासनाने पावसाकडून मिळालेली पूर्वसूचना समजावी आणि नालेसफाईची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करून घ्यावीत. नालेसफाईची अपूर्ण कामे पूर्ण झाली तरच मुंबईकरांना पावसाचे पुढील चार महिने सुसह्य होतील. पावसाच्या या इशार्‍याने वेळीच जागे होऊन नालेसफाई करण्यासाठी त्वरित सूचना द्याव्यात; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेऊन पालिका प्रशासनाला आपल्या स्टाईलने जागे करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad