प्रत्येक बँक शाखेने किमान एका दलित उद्योजकास आधार द्यावा! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2013

प्रत्येक बँक शाखेने किमान एका दलित उद्योजकास आधार द्यावा!

मुंबई : स्वातंत्र्य मिळून ६६ वष्रे उलटली तरी देशातील जाती व्यवस्थेचा कलंक धुवून निघालेला नसून समाज अजूनही दुभंगलेला आहे. समाजातील हा असमतोल दूर करण्यासाठी देशातील बँकांच्या प्रत्येक शाखेने किमान एका दलित उद्योजकास आधार द्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी मुंबईत केले. ते दलित उद्योजकांना अर्थसहाय्य करण्यासाठी उभारण्यात आलेल्या 'डिक्की एसएमई फंडा'चे अनावरण करण्याप्रसंगी बोलत होते. 

ते म्हणाले, बँकांनी असे केल्यास अर्थव्यवस्था व सामाजिक व्यवस्था यात समतोल राहाण्यास मदत होईल. देशात बँकांच्या एकूण एक लाख शाखा आहेत. प्रत्येक शाखेने जर एका दलित उद्योजकास आधार दिला तर देशात एक लाख फुले बहरू लागतील. समाजातील जाती व्यवस्थेचा कलंक दूर करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक पातळीवर सर्वसमावेशी प्रयत्न होण्यास मदत होईल. फंडाविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, 'डिक्की एसएमई फंड' हा एक व्हेंचर कॅपिटल फंड असून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस या दलित उद्योजकांच्या संघटनेने प्रवर्तित केला आहे. या फंडात एकूण ५00 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. यातील निधी पुढील दहा वर्षांत दलित उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. या फंडाला सेबीची मान्यता मिळाली असून सीडबी बँकेने दहा कोटी रुपये सुरुवातीचे योगदान दिले आहे. ही एक छोटी सुरुवात असून लवकरच याचा विशाल वटवृक्ष होईल, अशी अपेक्षा चिदंबरम यांनी याप्रसंगी व्यक्त केली. सरकार लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. खासकरून दलितांनी प्रवर्तित केलेल्या लघु व मध्यम उद्योगास खास महत्त्व देणार आहे. लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एकूण आठ टक्के वाटा आहे, तर निर्मिती क्षेत्रात तब्बल ४५ टकके वाटा आहे. तसेच देशातून होणार्‍या एकूण निर्यातीत या क्षेत्राची ३६ टक्के भागीदारी आहे. दलित उद्योजकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या पहिल्या व्हेंचर फंडाचे अनावरण मुंबईत ताज महाल हॉटेलच्या बॉल रूमध्ये करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad