पाणीपट्टीत दरवर्षी आठ टक्के वाढ करण्याच्यापालिकेच्या धोरणानुसार यंदाही पाण्याचे दरवाढवण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे . दरवाढीचाहा प्रस्ताव शुक्रवारी स्थायी समितीत येत असून १६जूनपासून वाढ अमलात येणार आहे .
सुबोध कुमार हे पालिकेचे आयुक्त असताना सन २०१२- १३च्या अर्थसंकल्पात पाण्याचे दर प्रत्येक वर्षी आठटक्क्यांनी वाढविण्यास त्यांनी मंजुरी घेतली होती .त्याप्रमाणे हा प्रस्ताव आहे . दरवाढीमुळे महापालिकेचेयंदा सुमारे ७५ कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे .
मलनिःसारण आकारात ६० टक्के वाढ
पाणीपट्टीच्या नव्या दरावर ६० टक्के मलनिःस्सारण आकार वसूल करण्यात येणार आहे . मीटरभाडे , सुरक्षा ठेव आणि इतर आकार व शुल्कात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत . पाणीपट्टीआणि मलनिःस्सारण आकार प्रशासनाने अर्थसंकल्पातच तरतूद करून घेतल्याने दरवाढीच्याप्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीची आवश्यकता राहिलेली नाही . सदस्यांच्या माहितीचीऔपचारिकता आटोपल्यानंतर प्रशासन दरवाढ करण्यास मोकळे राहणार आहे .
पाण्याचा जुना दर नवीन दर
सामान्य ग्राहक ३३ . २५ रु .
गृहनिर्माण संस्था ४४ . ३२ रु .
व्यावसायिक दर
लघुउद्योग १७ . २८ रु .
मोठे व्यावसायिक ३३ . ४० रु .
उद्योगव्यवसाय ४३ . २० रु .
फाईव्हस्टार हॉटेल्स ६४ . ८० रु .

No comments:
Post a Comment