वॉशिंग्टन : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळल्याचा दावा खोटा ठरल्यानंतर अमेरिकेने आपल्या सायबर हेरगिरीचे सर्मथन करताना आणखी एक दावा केला आहे. अमेरिकेने सायबर हेरगिरीच्या माध्यमातून २0 देशांतील दहशतवादी कट उधळले. तसेच गोळा केलेली माहिती दर ५ वर्षांनंतर नष्ट केली जात असल्याचे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने म्हटले आहे. ब्रिटिश दैनिक आणि अमेरिकेचा माजी गुप्तहेर एडवर्ड स्नोडेनने अमेरिकेच्या सायबर हेरगिरीचा भांडाफोड केल्यानंतर अमेरिकेच्या भूमिकेवर जगभरातून प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचेच स्पष्टीकरण देताना जगभरातील माहिती दहशतवादी हल्ले टाळण्यासाठीच गोळा केली जात असल्याचे अमेरिकेच्या 'एनएसए' या संस्थेने स्पष्ट केले. 'परदेशी गुप्तचर सर्वेक्षण कायद्यांतर्गत एका गुप्त न्यायालयात सर्वेक्षणाचे आदेश काढले जातात. त्यानुसार, अमेरिकेसह जगभरातील माहिती गोळा करण्याचे अधिकार अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संस्थेला देण्यात आले. एनएसए दर ९0 दिवसांना गोळा केलेल्या माहितीचे निरीक्षण करते,' असे अधिकार्यांनी सांगितले. अधिकार्यांच्या माहितीप्रमाणे माध्यमांमध्ये अमेरिकेच्या सर्वेक्षणाविषयी खोटी माहिती प्रसारित केली जात आहे. अमेरिका केवळ संशयित लोकांचीच माहिती गोळा करत आहे. माध्यमांवर प्रसारित केल्याप्रमाणे अमेरिका दररोज लाखो नागरिकांची हेरगिरी करत आहे. प्रत्यक्षात मात्र गेल्या वर्षभरात अमेरिकेने केवळ ३00 जणांची माहिती गोळा केली. विशेष म्हणजे गोळा करण्यात आलेली माहिती प्रत्येक ५ वर्षांनंतर नष्ट करण्यात येत असल्याचेही अधिकार्यांनी स्पष्ट केले. 'यापूर्वी दिलेल्या स्पष्टीकरणात मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीला सायबर हेरगिरीमुळेच पकडल्याचे अमेरिकेने म्हटले होते. अमेरिकेचा हा दावा न्यूयॉर्कच्या एका शोधपत्रिकेने खोटा ठरवला. त्यानंतर अमेरिकेने नव्याने माहिती जाहीर केली. |
Post Top Ad
17 June 2013
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment