मुंबई : मध्य रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच स्वत:चे आरक्षित तिकीट दुसर्याला देणे, विदाऊट तिकीट प्रवास करणे अशा घटनांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे.
अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध मे महिन्यात केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने १३ कोटी ७५ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मे महिन्यात फुकट्या प्रवाशां विरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण २ लाख ५७ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. मे २0१२ मध्ये १ लाख ४0 हजार गुन्हे नोंदविण्यात आले होते. मे २0१२ मध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ६ कोटी ३६ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता, तर यंदाच्या वर्षी करण्यात आलेल्या मे महिन्याच्या कारवाईत तब्बल १३ कोटी ७५लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
एप्रिल ते मे २0१३ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ४ लाख २४ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून २२ कोटी १५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, तर एप्रिल ते मे २0१२ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेल्या कारवाईत ३ लाख ३0 हजार गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून १५ कोटी ४१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment