डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद गेले कित्तेक वर्षे चांगलाच गाजत आहे. मे २०१२ मध्ये धर्मादाय आयुक्ताच्या कोर्टाने प्रीतमकुमार शेगावकर, डी जे गांगुर्डे. प्रिन्सिपल पाटील यांची विश्वस्त म्हणून केलेली नियुक्ती बोगस असून डॉ. एस. पी. गायकवाड आणि एम. एस. मोरे यांची प्रमुख विश्वस्त म्हणून नेमणूक केली आहे. प्रमुख विश्वस्त म्हणून नेमणूक झाल्याने बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत डॉ. एस. पी. गायकवाड आणि एम. एस. मोरे हे पदाची सूत्रे स्वीकारण्यास गेले असता त्यांना पदभार स्वीकारन्या पासून जुन्या विश्वस्तानी रोखण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी बाळासाहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला यामध्ये महिला सह ९ कायकर्ते जखमी झाले होते. त्यापैकी संतोष लोखंडे, राकेश गायकवाड, मनोज मर्चंडे, संजय किर्तीकर हे ४ कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी निखिल सूर्यवंशी, अमर पिंपटकर, अरुण कांबळे या प्रमुख पदाधिकार्यांसह ४७ जणांना अटक केली होती. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. अटक केलेल्या ४७ कार्यकर्त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर नंतर सोडण्यात आले होते.
संस्थेत दादागिरी, गुंडगिरी करणार्या बडतर्फ सदस्यांना वेळीच आवरण्यात यावे, अशी तक्रार अँड. आंबेडकर यांनी आझाद मैदान पोलिसांत केली. न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉ. एस. पी. गायकवाड आणि एम. एस. मोरे यांना पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनावर अधिकार देण्यात आला आहे. तसेच माजी सदस्थ डॉ. डी. जे. गांगुर्डे, गंगाधर पाणतावणे आणि इतरांचे ३ मे २000 रोजी सभासदत्व नाकारले होते. असे असतानाही डॉ. गांगुर्डे, पाणतावणे, अँड. प्रीतमकुमार शेगांवकर, व्ही. एम. प्रधान, एस. एल. भागवत हे संस्थेमध्ये अनधिकृतपणे संस्थेच्या कारभारात ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप पीपल्स एज्युकेशनचे विद्यमान अध्यक्ष एम. एस. मोरे, एस. पी. गायकवाड आणि अँड. आंबेडकर यांनी केला होता.
या लाठीहल्ल्या नंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त बजाज व डी.सी.पी. दोर्जे यांच्या सोबत बैठकीमध्ये सर्व कायदेशीर कागदपत्रे पाहील्यानंतर पोलिसांकडून चालढकल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी पोलिसांनी ७ दिवसांमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय परिसरातील गुंडांना कढून टाकू असे आश्वासन पोलिसांनी दिले होते.
संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रीतमकुमार शेगावकर यांच्यावर औरंगाबाद येथे वाडेकर नावाच्या प्रिन्सिपल व प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल असून शेगावकर हे तिथून फरार होते. प्रीतमकुमार शेगावकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला २ मेडिकल व २ अभियांत्रिकी महाविद्यालये डी. वाय. पाटील संस्थेला विकली आहेत. दुसरे विश्वस्त गांगुर्डे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. याच गांगुर्डे यांच्यावर पेपर फुटी प्रकरणी नेमलेल्या ल्यामिंगटन कमिशनने असा नालायक माणूस शिक्षण क्षेत्रात असता कामा नये असा शेरा मारल्याचा आरोप करण्यात आला होता.
काही काळापूर्वी याच महाविद्यालयातील प्राध्यापिका चित्रा साळुंके यांनी आय पी एस अधिकाऱ्यांना एल एल बी च्या परीक्षेत मार्क वाढवल्याचा प्रकार झाला होता. या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांमधील बडे अधिकारी अडकले आहेत. या अधिकाऱ्यांना मार्क वाढवून देण्याचे काम करण्याचे काम येथील बोगस विश्वास्थांकडून झाले आहे. नवीन विश्वस्त आल्यास या प्रकरणाची चौकशी होऊन आपण उघडे पडू याभितीने जुन्या विश्वस्तांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी जुन्या विश्वस्तांच्या बाजूने म्यानेज होऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला होता.
या प्रकरणाला बरोबर एक वर्ष पूर्ण झाले असतानाच ज्या सिद्धार्थ महाविद्यालया मध्ये प्रकाश आंबेडकर यांना आत जाण्यापासून रोखण्यात आले होते त्याच सिद्धार्थ महाविद्यालयात प्रकाश आंबेडकर यांचे भाऊ आनंदराज आंबेडकर यांनी गेल्या सोमवारी प्रवेश करून पीपल्सचा ताबा घेतला आहे. रामदास आठवले गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये पिपल्सच्या अध्यक्षपदावरून भांडण सुरु असतानाच आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा उडी मारून संपूर्ण संस्थेवर ताबा मिळवला आहे.
आनंदराज आंबेडकर यांनी पिपल्सचा ताबा मिळवल्यावर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयाने अशा परिस्थिती मध्ये काय करावे याबाबत मार्गदर्शन करावे असा दावा दाखल केला होता. या दाव्याची शनिवारी २९ जूनला सुनवाही सुरु असताना धर्मादाय आयुक्तांच्या न्यायलयाने बेकायदेशीर ठरवलेले आठवले गटाचे विश्वस्त डॉ. डी. जे. गांगुर्डे व इतरांनी आम्हीही विश्वस्त असून आम्हाला सुद्धा संस्थेच्या कार्यालयात प्रवेश मिळावा अशी मागणी केली असता न्यायालयाने आठवले गटाची मागणी सपशेल फेटालून लावत जैसे थे परिस्थिती ठेवण्यास सांगितली आहे.
न्यायालयाच्या या निकालामुळे आधीच पीपल्समध्ये घुसून आनंदराज यांनी ताबा मिळवून आठवले गटाला दणका दिला असतानाच न्यायालयाच्या निकालामुळे दुसरा दणका मिळाला आहे. एकीकडे रामदास आठवले यांच्या समर्थक ज्योतीकर यांची बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी धर्मादाय आयुक्तांनी केलेली नियुक्ती योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे आठवले गटाकडे बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया कारभार जाणार हे पक्के झाले असताना पिपल्सच्या बाबत धर्मादाय आयुक्तांनी दिलेले निकाल मात्र आठवले गट तयार नसल्याचे दिसत आहे.
गेले कित्तेक वर्षे पीपल्सच्या कारभारावर कोणाचे वर्चस्व राहणार यावरून आठवले गट, आंबेडकर गट यांच्यामध्ये भांडण सुरु असल्याने मागील वर्षी झालेल्या राड्या नंतर व आता आनंदराज यांनी पीपल्सचा ताबा घेतल्या नंतर पोलिसांनी संस्थेच्या सर्व महाविद्यालयांच्या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामुळे सध्या महाविद्यालयीन प्रवेशाचे दिवस सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असा सर्वानीच विचार करण्याची गरज आहे.
सध्या पोलिसांची फौज सिद्धार्थ महाविद्यालयाबाहेर उभी करण्यात आली असल्याने परिसरातील आस्थापनाना याचा त्रास होऊ लागला आहे. त्यांनी सदर ठिकाणची आप आपली कार्यालये इतर ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर ताबा मिळवण्याच्या नादात इतर लोकांनाही त्याचा त्रास होत असून यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव बदनाम होत आहे याचा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे.
रामदास आठवले यांना वीस वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी वाल्यांनी वापरून फेकून दिले आहे, आठवले सेना भाजपकडे गेल्याने आठवले यांच्या जागी आंबेडकरी समाजातील नवीन नेतृत्व उभे करून त्या नेतृत्वाच्या माध्यमाने काँग्रेस, राष्ट्रवा दीला फायदा व्हावा म्हणून इंदू मिल आंदोलना पासून आनंदराज यांना नवीन नेतृत्वाच्या रूपाने पुढे आणले गेले आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आपल्याला परवडणारे नाही हे काँग्रेस, राष्ट्रवादीवाले चांगलेच ओळखून असल्याने त्यांनी आनंदराज यांना पडद्यामागून सहकार्य देवून पिपल्सचा ताबा मिळवण्यासही मदत केली आहे अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स या संस्थेची महाविद्यालये असून यामधून विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मळावे अशी अपेक्षा आंबेडकर यांना होती. परंतू संस्थेमध्ये सध्या जे राजकारण चालू आहे यावरून बाबासाहेबांचा हेतू सध्या होताना दिसत नाही. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्थावर ताबा मिळवण्यावरून भांडणे आणि मारामाऱ्या करण्यापेक्षा स्वताच्या हिमतीवर स्वताच्या संस्था स्थापन करून महाविद्यालये उघडून चालवून दाखवावीत असे आव्हान आंबेडकरी जनतेकडून केले जात आहे.
अजेयकुमार जाधव
Mob. No.- 09969191363
No comments:
Post a Comment