मुंबई : पावसाळ्याच्या काळात घाटकोपर (प.) आणि विक्रोळी (प.) येथील रहिवाशांना पालिकेने सावधानतेचा इशारा दिला आहे. या डोंगराळ भागात पावसाळ्यात दरड, संरक्षण भिंत पडून जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील झोपडीधारकांनी या काळात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मनपाने पुढील विभागांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विक्रोळी (पश्चिम) येथील लोकमान्य सोसा. व जनकल्याण सोसा, वर्षा नगर, राहुल नगर, आंबेडकर नगर, कैलास कॉम्प्लेक्स, संजय गांधी नगर, उमा महेश व भीमाशंकर सोसायटी, गणेश नगर, हनुमान नगर, घाटकोपर (प.) येथील राम नगर, खंडोबा टेकडी, एकता नगर, काजू टेकडी, कातोडी पाडा, पितामह रामजी नगर, भीम नगर.
No comments:
Post a Comment