मुंबई : मुसळधार पावसात पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेने १८0 सखल भागांत लावलेल्या २२0 पंपांपैकी अनेक पंप बंद अवस्थेत व अकार्यक्षम असल्याचे निदर्शनास आल्याची तक्रार सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने आता पंपांचे १0 जूनपर्यंतचे भाडे कंत्राटदारास न देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या शनिवारी व रविवारी जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून रेल्वे, रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना चांगलाच त्रास झाला. त्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते व नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाकडे तक्रारी केल्या व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर पालिकेने या पंपचालक-मालक कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
No comments:
Post a Comment