मुंबई : मुसळधार पावसामुळे आतापर्यंत मुंबईत ५५१ झाडे उन्मळून पडली आहेत. शहरात २१२, पूर्व उपनगरात ११२, पश्चिम उपनगरात २२६ झाडे पडली आहेत. अद्यापि पावसाचे साडेतीन महिने बाकी असल्याने या कालावधीत आणखी वृक्षवल्लीचा नाश होण्याची शक्यता आहे. मुंबईत ७ जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. या पहिल्याच दिवशी विविध ठिकाणी ३0 झाडांची पडझड झाली होती. त्यानंतर पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे वृक्षांच्या फांद्या आणि मुळासकट उन्मळून पडण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. १६ जून रोजी सर्वाधिक १२0 झाडे पडल्याच्या तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या होत्या. मात्र काही वेळा काही समाजकंटक वा दुकानदार सोसायटीचे सदस्यही पावसाच्या निमित्ताने झाडे पाडण्यासाठी कारस्थाने करतात. झाडांच्या पडझडीनंतर त्या ठिकाणी वृक्षरोपण होणे गरजेचे असताना त्याबाबत पलिककेकडून पाठपुरावा होत असल्याचे दिसत नाही.
Post Top Ad
22 June 2013
Home
Unlabelled
मुसळधार पावसामुळे मुंबईत ५५१ झाडे उन्मळून पडली
मुसळधार पावसामुळे मुंबईत ५५१ झाडे उन्मळून पडली
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment