पारंपारिक शिक्षण घेत असताना मुक्त विद्यापीठाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी
शासनकर्ती जमात बनण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व बहुजनांना दिले. एखादा नियम आपल्याला मान्य नसेल,तो सर्वसामान्यांच्या हिताचा नसेल तर, उच्च पदावर जाऊन तो निर्णय बदल्याची क्षमता अंगी बाळगली पाहिजे...यासाठी यूपीएससी/एमपीएससी या स्पर्धापरीक्षेमार्फत प्रशासकीय अधिकारी बनण्याची संधी आज सर्वांसाठी खुली आहे.
विद्यार्थी अनेकदा पदवी शिक्षण पूर्ण करुन नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. इथेही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही की अनेकांचा वेळ वाया जातो व हाती निराशा येते.
१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी बरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने बी.ए.पब्लिक सर्व्हिसेस हा पदवी शिक्षणक्रम विकसित केला आहे. पारंपारिक विद्यापीठात शिकत असताना विद्यार्थी मुक्त विद्यापीठात बी.ए.पब्लिक सर्व्हिसेस हा शिक्षणक्रम पूर्ण करता येऊ शकतो. इयत्ता दहावीतल्या एन.टी.एस. पासून बँकिग , संरक्षण, कारकून भरती, तसेच यु.पी.एस.सी द्वारे आय.ए.एस., आय.एफ.एस., आय.पी.एस., केंद्रीय सेवा आणि एम.पी.एस.सी.द्वारे डेप्युटी कलेक्टर, डी.वाय.एस.पी.,तहसीलदार,बी.डी. ओ., अन्य राज्य सेवा अशांसारख्या वरिष्ठ पदावर अधिकारी ज्या परीक्षांमधून निवडले जातात अशा सर्व स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करुन उत्तम अधिकारी, कार्यकर्ता अधिकारी व्हायचा निश्चय करुन जर युवक-युवती शासकीय सेवांमध्ये भरती झाले तर चांगले बदल घडतील. हा उद्देश समोर ठेवून चाणक्य मंडळाचे शिक्षक उत्तोमोत्तम प्रशिक्षण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुक्त विद्यापीठामार्फत सर्टीफीकेट इन सॉफ्ट स्कील, डिप्लोमा ईन पब्लिक सर्व्हिसेस, बी.ए.पब्लिक सर्व्हिसेस आणि एम.ए.पब्लिक सर्व्हिसेस हे शिक्षणक्रम उपलब्ध करुन दिले आहेत. १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकतात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी विद्यापीठाची पूर्वतयारी परीक्षा उत्तीर्ण करुन या शिक्षणक्रमाच्या प्रवेशास पात्र ठरू शकतात.
भूगोल, इतिहास, समाजसुधारक, राज्यघटना, सामान्य विज्ञान, अंकगणित, भारताची अर्थव्यवस्था, प्रचलित घडामोडी, भारतीय राज्यपद्धती, इंग्रजी, मराठी, बुद्धिमापन चाचणी, इत्यादी विषयांचा या शिक्षणक्रमात समावेश केला आहे.
विद्यार्थ्यांना उपग्रहाच्या माध्यमातून शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून विद्यापीठाने अहमदाबाद येथील भारत सरकारच्या भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संघटन (इस्त्रो) या संस्थेच्यावतीने एज्युसेंट या उपग्रह वाहिनीद्वार (सॅटेलाईट चॅनल) दूरशिक्षणाचा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पांतर्गत व्हर्चुअल लर्निंग सेंटर कार्यान्वित केलेली आहेत. याद्वारे संपर्क सत्रे घेतली जातात.
जनसंपर्क अधिकारी
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
मो - 9892740852
मो - 9892740852
No comments:
Post a Comment