मागासवर्गीय उद्योजकांच्या सहाय्यासाठी ‘डिक्की उभारणार ५०० कोटींचा निधी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2013

मागासवर्गीय उद्योजकांच्या सहाय्यासाठी ‘डिक्की उभारणार ५०० कोटींचा निधी

गुरुवारी पी. चिदंबरम यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई - अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी दलित चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) ५०० कोटी रुपयांचा भांडवल निधी उभारणार आहे, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष मिलींद कांबळे यांनी येथे दिली. 

सध्या सरकारच्या सर्व योजना स्वयंरोजगार निर्मितीच्या उद्देशाने राबविल्या जातात. मात्र त्यात उद्योजकता वाढावी हा उद्देश आढळत नाही, असे मिलींद कांबळे म्हणाले. 
अर्थमंत्री पी. चिदंबरम याच्या हस्ते ‘डिक्की’च्या निधीचे औपचारिकरित्या येत्या गुरुवारी उद्घाटन होणार असून भांडवल नियंत्रण करणार्‍या ‘सेबी’ने गेल्या वर्षी पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून गेल्या वर्षी या निधीला मंजूरी दिली आहे.

‘डिक्की’चा हा निधी ५०० कोटीचा असेल, या वर्षी १५० कोटी रुपये उभारण्यात येथील, असे कांबळे यांनी सांगितले. हा निधी एससी व एसटी वर्गातील उद्योजकांनी उभारलेल्या उद्योगात ५ते १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या निधीच्या उभारणीसाठी वित्तीय संस्थांशी व उद्योजकांशी संपर्क साधला आहे. तर लघुउद्योग विकास बँकेने (सिडबी) या निधीत १० कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे जाहिर केले आहे. याखेरीज एलआयसी व आयडीएफसी हे उपक्रमही गुंतवणूकीची घोषणा करणार आहेत, असे कांबळे यांनी सांगितले. 

नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेेकसिंग अहलुवालिया यांच्यासोबत १२व्या पंचवार्षिक योजनेच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत प्रथम अशा प्रकारच्या निधीची कल्पना पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सेबीकडे अर्ज करण्यापूर्वी ‘डिक्की चे पदाधिकारी केपीएमजी, आयएल अँड एफएस आणि वित्तीय सल्लागारांशी विचारविनिमय करणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad