मुंबई : अँसिड हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा आणि अँसिड विक्रीवर बंदी आणण्याची मागणी अँड़ निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सोमवारी पत्रकार संघ येथे केली. प्रीती राठी या अँसिड हल्ल्यात मृत पावलेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली.
|
या वेळी प्लास्टिक सर्जन डॉ. अशोक गुप्ता, अँसिड हल्ल्यामध्ये चेहरा विद्रूप झालेल्या अर्चना, रूपा, शायना, प्रज्ञा, लक्ष्मी आदी मुलीही उपस्थित होत्या. प्रियकरांनी अँसिड फेकलेल्या, सावत्र आईने अँसिड फेकलेल्या कहाण्या या वेळी या मुली सांगत होत्या. आम्हाला नोकरी मिळत नसून सरकारनेही आमच्या अनेक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी या वेळी केली. आम्ही गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली असून त्या वेळी विविध मागण्याही केल्या. आम्ही पाच जणी प्रीतीला आधार देण्यासाठी मुंबईत आलो, मात्र आमची भेट होण्याआधीच प्रीतीचा मृत्यू झाला, असे लक्ष्मी हिने सांगितले. अँसिड हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचार म्हणून पाणी पाजा, भाजलेल्या भागावर अर्धा तास पाणी मारा, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. अर्चना नावाच्या मुलीवर अँसिड फेकणारा तरुण विष पिऊन आला, अँसिड फेकले आणि अर्चनाच्या घरीच तो मरण पावला. त्यामुळे तिची केसच बंद करण्यात आली. मात्र अर्चनाच्या विविध मागण्या सरकार दरबारी पडून आहेत.
No comments:
Post a Comment