मुंबई टू गोवा झाला मृत्यूचा सापळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2013

मुंबई टू गोवा झाला मृत्यूचा सापळा


मुंबई : गोव्याला जाणे म्हणजे एक थ्रील असते. तेथे काही दिवस सुट्टी घालवणे म्हणजे स्वर्ग सुख. परंतु अपघाती वळणे, तीव्र उतार, अरुंद पूल यामुळे मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग साक्षात मृत्यूचा महामार्ग बनला आहे. याठिकाणी सुमारे ३९२ मृत्यूचे सापळे प्रवाशांचे सातत्याने बळी घेत आहेत.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ आणि भीषण अपघात हे जणू एक समीकरणच बनले आहे. गोव्याला जाणारा रस्ता महामार्ग असला तरी तो अत्यंत अरुंद व धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत या महामार्गाचा विकास मात्र झालेला नाही. अपघाती वळणे, तीव्र उतार, नद्यांवरील अरुंद पूल यामुळे या मार्गावर अपघात हा ठरलेलाच आहे. राज्यात १ हजार २१0 अपघातप्रवण क्षेत्र आहेत. त्यातील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र मुंबई-कोकण पट्टय़ात असून मुंबई-गोवा महामार्गावर सर्वाधिक अपघात स्थळे आहेत. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो, मात्र या महामार्गाच्या विकासासाठी आणि रुंदीकरणासाठी मात्र काहीही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. मुंबई आणि गोवा ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची राज्ये असूनदेखील या महामार्गाचा विस्तार मोठय़ा प्रमाणात केला जात नाही. दरवर्षी गणेशोत्सवामध्ये या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबविली जाते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे.
 
राज्यातील २0११ मधील अपघात महाराष्ट्रात २0११ मध्ये ६८ हजार ४३८ अपघात झाले होते. त्यामध्ये १३ हजार ५७ जणांचा बळी गेला होता. शिवाय ४५ हजार ६२८ लोक जखमी झाले होते. देशभरात राष्ट्रीय महामार्गावर १ लाख ४९ हजार ७३२ अपघात झाले होते. त्यामध्ये ५२ हजार ९४२ जणांचा मृत्यू झाला होता.
एकूण अपघात - ५६ हजार ७८७ प्रवासी मृत्युमुखी - 
१0 हजार ५३१ गंभीर जखमी - 
२0 हजार ४५६ किरकोळ जखमी - 
१७ हजार ३0३देशात दर मिनिटाला एक अपघात 
३.७ मिनिटाला एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू होतो

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad