मातंग समाजाचा हलगी मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2013

मातंग समाजाचा हलगी मोर्चा

मुंबई : येत्या हिवाळी अधिवेशनात मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवावा. या व आदी मागण्या घेऊन क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना २६ जून रोजी भायखळा ते आझाद मैदानपर्यंत हलगी मोर्चा काढणार आहे, अशी माहिती सेनेचे संस्थापक शंकरभाऊ तडाखे, अँड़ श्रीधर कसबेकर यांनी मंगळवारी पत्रकार संघ येथे दिली. एकत्रित आरक्षण पद्धतीच्या लाभ वाटपामध्ये स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात १३ टक्के आरक्षणाचा लाभ मातंग समाजाला झाला नाही. भारतीय संविधानाच्या आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही लाजीवरणाची गोष्ट आहे, असे सांगत तडाखे म्हणाले, ब्रिटिशांची १५0 वर्षे व स्वातंत्र्याच्या राज्यकर्त्यांची ६५ वर्षे अशी २१५ वर्षे न्याय मिळवण्यासाठी लढणार्‍या मातंगांनी या अन्यायाविरुद्ध अखेरचे बंड करणे ठरवले आहे, असे मुंबई प्रदेश अध्यक्ष राजेशभाऊ पवार, भगवानराव बोताळजी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad