मुंबई तीन दिवस होणार ठप्प? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2013

मुंबई तीन दिवस होणार ठप्प?

चार चाकी रिक्षांना विरोध, रिक्षा भाडेवाढ, मनपा कर्मचा-यांसाठी पगार आणि भत्ते या मागण्यांसाठी शरद राव यांच्या युनियनने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे १८, १९ आणि २० जून रोजी मुंबईचा कारभार ठप्प होण्याची शक्यता आहे.

शरद राव यांनी संपाची हाक देताच मुंबईतील रिक्षा तसेच मुंबई मनपाच्या पाणी पुरवठा, बेस्ट, आरोग्य, साफसफाई, सांडपाणी व्यवस्थापन, शिक्षण आदी विभागांच्या कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

संपासंदर्भात सोमवारी, १७ जून रोजी शरद राव आणि त्यांचे सहकारी पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत. या बैठकीत पावसासंदर्भात वेधशाळेने दिलेले अंदाज, मागण्या पूर्ण होण्याची शक्यता आदी विषयांवर सविस्तर चर्चा होईल आणि संपासंदर्भातला अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. संप होणार असा निर्णय झाला तर त्याच दिवशी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad