नवी दिल्ली- इंटरनेट माध्यमाची ताकद मिळाल्यानंतर भारतीय युवकांनी संवादाचे साधन म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परीणाम फोन कॉल कमी होण्यावर झाला आहे. भारतातील तब्बल ७५ टक्के युवक संवादाचे साधन म्हणून फोन ऐवजी सोशल मीडियाचा वापर करतात असे आढळून आले आहे.
एसएमएसच्या मुळावर चॅट अॅप?
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या ‘जेन-वाय’ २०१२-१३या अहवालानुसार देशातील शाळा आणि कॉलेजमधील युवक अभ्यासक्रमासंदर्भातील शेअरीगसाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे संवादासाठी स्वस्त, स्मार्ट आणि सहजपणे उपलब्ध होणारे साधन म्हणून युवक इंटरनेटला अधिक पसंती देत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
देशातील १४ प्रमुख शहरातील तब्बल १७ हजार ५०० शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास केल्यानंतर टीसीएसने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. संवादासाठी प्रामुख्याने फेसबुक, ट्टिवटर आणि ‘वॉट्स अॅप’चा वापर अधिक केला जातो. जे विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात त्यापैकी २० टक्के मोबाइलवरून इंटरनेटचा वापर असे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
याच बरोबर ऑनलाइन खरेदी बरोबरच चित्रपटांचे तिकीटे, रेल्वे आणि विमानाचे तिकीट ऑनलाइन बुक करण्यासाठी प्राधान्य दिले जात असल्याचे टीसीएसच्या अहवालात म्हटले आहे.
जुलै ते डिसेंबर २०१२ या कालावधीत मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळूरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, नागपूर कोइबतूर या शहरामध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
No comments:
Post a Comment