मुंबई : व्यापार्यांच्या एलबीटी (स्थानिक संस्था कर) विरोधाकडे शासन संशयाने पाहत निर्णय घेण्यास टाळाटाळ करीत आहे. या पार्श्वभूमीवर १५ व १६ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फेडरेशन असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने म्हटले आहे. या बंदला इंडस्ट्रीज व ट्रान्सपोर्ट संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष महेश गुरनानी, राजीव राठी यांच्यासह प्रमुख व्यापार्यांनी बैठकीत महाराष्ट्र बंदचा एकमुखी कार्यक्रम जाहीर केला. ४८ तास बंद ठेवून शासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न व्यापारी करणार आहेत. शासन बधत नसल्याने व्यापार्यांनी सतत बैठका घेऊन एलबीटी नको. विक्रीकराच्या व्हॅटमध्येच थोडीबहुत वाढ करून आमची एलबीटीतून सुटका करा, अशी प्रमुख मागणी आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि १९ महानगरपालिका हद्दीतील व्यापार्यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघेल, अशी व्यापार्यांना आशा होती; पण ती फोल ठरली. व्यापारी ईष्र्येला पेटले असून, काही झाले तरी महानगरपालिकांत एलबीटी भरणार नाही, या भूमिकेत ते आहेत. महाराष्ट्र बंदचे आयोजन करण्याचे निश्चित झाले असून, शासनास तसा पत्रव्यवहार करण्यावर व्यापारी ठाम आहे.
Post Top Ad
20 June 2013
Home
Unlabelled
एलबीटीविरोधात २ दिवस महाराष्ट्र बंद
एलबीटीविरोधात २ दिवस महाराष्ट्र बंद
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment