पुढील 'दलाई लामा' असणार महिला? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2013

पुढील 'दलाई लामा' असणार महिला?

सिडनी- ऑस्ट्रेलियातील कडवट लिंगभेदाच्या वादात उडी घेत दलाई लामा यांनी सांगितले की, त्यांचा वारसदार म्हणून तिबेटन लोकांच्या धर्मगुरूपदी एखादी महिलाही असू शकते. 

'महिला दलाई लामा अधिक हितावह असतील तर अशा परिस्थितीत आपोआपच महिला दलाई लामा येईल,' असे दलाई लामा यांनी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले. चीनने हद्दपार केलेले 77 वर्षीय दलाई लामा सध्या ऑस्ट्रेलियात दहा दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. 

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड यांनी सुरू केलेल्या लिंगभेद संघर्षाबाबत प्रश्न विचारला असता दलाई लामा म्हणाले, 'जगामध्ये असमानतेची नैतिक आणीबाणी आहे. त्याचा त्रास जगाला होत असून, दयाभाव असणाऱ्या नेत्यांची गरज आहे.'

'त्या दृष्टिकोनातून पाहता महिलांकडे जीवशास्त्रीयदृष्ट्या अधिक दयाभाव असतो (कनवाळू) असतो. महिला इतरांच्या कल्याणाबाबत अधिक समजूतदार असतात. माझ्या स्वतःबाबत सांगायचे तर, माझे वडील खूप रागीट होते. मला त्यांच्याकडून अनेकदा 'प्रसाद'ही मिळायचा. मात्र, माझी आई खूपच दयाळू होती,' असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad