रिझर्व्ह बँकेने, सरकारने निर्बंध घातले तरी सोन्याची आयात कमी होणे अशक्यच! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2013

रिझर्व्ह बँकेने, सरकारने निर्बंध घातले तरी सोन्याची आयात कमी होणे अशक्यच!

मुंबई - वाढत्या सोने आयातीत पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेने कितीही निर्बंध घातले तरी सोन्याची आयात कमी होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन बॉम्बे बुलियन असोसिएशनने आज केले. सरकारतर्फे बँकांच्या सोने आयातीवर निर्बंध आणले गेले आहे, परंतु त्याचवेळी सोने निर्यात करणार्‍या ६० ते ७० खासगी निर्यातगृहांवर सरकारचे कोणतेही बंधन नाहीत. यामुळे सोने आयातीत पायबंद घालण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, असा आरोपही असोसिएशनने केला.
अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी ग्राहकांनी सोने खरेदी किमान वर्षभरासाठी तरी टाळावी, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत नुकतेच केले होते. बॉम्बे बुलियन असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी त्याला आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सराफ उद्योगाबाबत सध्या केंद्र सरकारच्या वतीने केली जाणारी विधानं ही तब्बल २० लाख लोकांची उपजीविका प्रत्यक्ष अवलंबून असलेल्या सराफ व्यवसायाला उद्ध्वस्त करणारी आहे. काळ्या यादीत टाकल्याप्रमाणे या व्यवसायाकडे पाहणे म्हणजे मोठ्या जनविभागाची उपासमार करण्यासारखेच आहे.
- मोहित कम्बोज अध्यक्ष, बॉम्बे बुलियन असोसिएशन

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad