मलेरिया - पालिकेची २० जूनपर्यंत डेडलाइन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2013

मलेरिया - पालिकेची २० जूनपर्यंत डेडलाइन

मुंबई - मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना न राबवणार्‍यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत महानगरपालिकेने दिले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित येणार्‍या विभागांनी त्यांच्या जागेवर मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना अद्याप पूर्ण न केल्याने त्यांना २० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही कामे अपूर्ण दिसली तर त्यांच्यावर खटले भरले जाणार आहेत.

महापालिकेने एप्रिलपासूनच आपल्या हद्दीमध्ये मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या. मुंबईतील केंद्र व राज्य सरकारच्या विभागांनाही अशा उपाययोजना ७ जूनपर्यंत पूर्ण कराव्यात असे पालिकेने कळवले होते. या कामाचा आढावा पालिकेच्या कीटकनाशक विभागाने घेतला. मध्य व पश्‍चिम रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, म्हाडा, एमबीपीटी, बीएसएनएल यांची ३० टक्के कामे प्रलंबित असल्याचे त्यांना आढळले. त्यांना २० जूनपर्यंत मुदत वाढवून दिल्याचे कीटकनाशक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नारिंग्रेकर यांनी सांगितले. 

केवळ राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने (एनटीसी) मुंबईतील आपल्या १३ कापड गिरण्यांमध्ये मलेरिया प्रतिबंधक उपाययोजना पूर्णपणे राबवली. आरोग्यासंबंधी अन्य कामांसाठी घरोघरी जाणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची मदत पावसाळी आजारांबद्दल जनजागृतीसाठी घेतली जाणार आहे. तसेच झोपडपट्ट्यांमध्ये पाणी साचण्यास वाव देणारा कचरा दूर करण्याचीही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती डॉ. नारिंग्रेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad