इमारतीचा भाग कोसळला, एक ठार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2013

इमारतीचा भाग कोसळला, एक ठार


BUILDING400

मुसळधार पाऊस कोसळत असतानाच सोमवारी रात्री माहीम येथील छोटा दर्गाजवळील अल्ताफ मॅन्शन बिल्डिंगचा एक भाग कोसळला. रात्री ८.१५ च्या सुमारास अल्ताफ मॅन्शनचा उत्तरेकडील भाग कोसळून एक महिला ठार आणि पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्ताफ मॅन्शन ही चार मजली इमारत असून त्याचा उत्तरेकडील भाग अचानक कोसळल्याने जैबुन्निसा अब्दुल सत्तार लाखा (७०) ही महिला ठार झाली आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी जखमींना भाभा, केईएम आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील शोरुमच्या बांधकामात केलेल्या चुकीच्या बदलांमुळे हा भाग कोसळल्याचे स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad