आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर्तुळात दोन वर्षांपूर्वी ज्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानं खळबळ उडवून दिली होती, तसाच प्रकार यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही झाल्याचं समोर येतंय. स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या राजस्थान रॉयल्सच्या तीन शिलेदारांना अटक करण्यात आल्यानं आयपीएल स्पर्धा संशयाच्या आणि वादाच्या भोव-यात सापडली आहे.
आयपीएल-६ मधील मोहाली आणि मुंबईत झालेले काही सामने 'फिक्स' असल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पहाटे राजस्थान रॉयल्सचं त्रिकूट आणि सात बुकींना अटक केली. एस. श्रीशांत आणि बुकींना त्यांनी दिल्लीतून ताब्यात घेतलं, तर अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमधून 'उचललं'. वानखेडेवरील मुंबई विरुद्धच्या कालच्या सामन्यासाठी ते संघासोबत आले होते. त्यांना मुंबईतल्या कोर्टापुढे हजर केल्या नंतर दिल्लीला नेलं जाईल.
बुकी आणि खेळाडूंमध्ये फोनवरून झालेल्या संभाषणाची टेप दिल्ली पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरून, हे स्पॉट फिक्सिंग असल्याचं स्पष्ट होत होतं. आपल्या खब-यांकडून त्यांनी संबंधित बुकींचा पत्ता मिळवला आणि राजस्थानच्या तीन क्रिकेटपटूंना अटक करण्यासाठीही चोख प्लॅन रचला. डीसीपी संजीव यादव यांच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली पोलीसांची टीम मुंबईत धडकली आणि त्यांनी मरिन लाइन्स पोलिसांच्या मदतीनं चव्हाण आणि चंडिलाला 'ट्रायडंट'मधून अटक केली. बुकीसोबत झालेल्या व्यवहाराचे पुरावे आणि पैसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेत. त्याचवेळी दिल्लीत श्रीशांत आणि सात बुकींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आयपीएलमधील 'स्पॉट फिक्सिंग'मध्ये आणखी काही खेळाडूंचा सहभाग असल्याचंही सूत्रांकडून कळतं. श्रीशांत, चव्हाण आणि चंडिला यांच्याविरुद्ध ठोस पुरावे नसल्यानं त्यांना अटक करण्याची संधी पोलिसांना दोन वेळा गमवावी लागली होती. पण, संभाषणाची टेप मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच ही कारवाई केली. त्याचप्रमाणे इतर खेळाडूंवरही पोलीस 'वॉच' ठेवून असल्याचं समजतं.
दरम्यान, फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. फिक्सिंगमध्ये संपूर्ण सामन्याचा निकालच ठरलेला असतो, तर 'स्पॉट फिक्सिंग'मध्ये ठरावीक वेळेला चौकार, षटकार आणि चेंडू 'फिक्स' केले जातात.

No comments:
Post a Comment