मुंबई : देशभरात महिलांवरील होणार्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मुंबई महानगरपालिकेतही महिला लैंगिक छळाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभरात पालिकेतील महिला कर्मचार्यांनी लैंगिक अत्याचाराबाबत २२ तक्रारी दाखल केल्याचे समोर आले आहे, तर दर महिन्याला लैंगिक अत्याचाराच्या दोन-तीन घटना घडत असल्याची माहिती महापालिका लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यकारी समितीच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी नागदा यांनी दिली.
मंगळवारी प्रमुख कामगार अधिकारी कामथे यांनी पालिका कामकाजाबाबतच्या सादरीकरणाच्या वेळी पालिका महिला कर्मचार्यांकडून लैंगिक अत्याचाराबाबतच्या तक्रारी लैंगिक छळ प्रतिबंधक कार्यकारी समितीकडे प्राप्त झाल्याची कबुली दिली. या अनुषंगाने समितीच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी नागदा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महिला कर्मचार्यांकडून महिन्याला दोन-तीन लैंगिक अत्याचार्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगितले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ होत असल्याने या समितीची सन २00३ मध्ये स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या तक्रारींमध्ये महिलांचा पाठलाग करणे, जाणीवपूर्वक वेगळ्य़ा हेतूने बोलवणे, अश्लील भाष्य करणे, आदींचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांकडून लैंगिक छळाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडून अशा प्रकरणात तक्रारदार महिला व ज्याच्या विरोधात तक्रार येते त्यांच्याकडून सखोल माहिती घेऊन चौकशी केली जाते. यानंतर दोषी कर्मचार्यांना समज देणे, त्यांची वेतनवाढ रोखणे, बदली करणे व अगदी गंभीर प्रकरणात कर्मचार्यास निलंबित करणे, अशा कारवाया केल्या जातात आणि तक्रारदार महिला क र्मचार्यांस न्याय दिला जातो, असे नागदा यांनी सांगितले.
Post Top Ad
01 May 2013
Home
Unlabelled
पालिकेत महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळात वाढ
पालिकेत महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळात वाढ
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment