मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष मधु चव्हाण यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. मधु चव्हाण यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे, त्यामुळे त्यांनी सर्व पदांचा त्याग केला आहे.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा मंजुरही केला आहे. काळाचौकी पोलिसात एका महिलेनं मधु चव्हाण यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हाही दाखल झाला. आपल्या तक्रारीत महिलेनं चव्हाणांनी २० वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. पक्षातील इतक्या ज्येष्ठ सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानं भाजपमध्येही खळबळ उडाली. मात्र त्यावर भाजपनं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. निवडणुकीच्या तोंडावर भाजपची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आपल्याला राजकीय जीवनातून उठवण्यासाठी हे आरोप केल्याचा दावा मधु चव्हाणांनी केलाय.
No comments:
Post a Comment