बेस्टच्या वीज बिल रीडिंगवर उपाय सापडला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2013

बेस्टच्या वीज बिल रीडिंगवर उपाय सापडला

मुंबई : बेस्टची वीज बिल रीडिंग आणि वितरणात घोळ झाल्याने बेस्ट प्रशासनाला त्याचा चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. यावर बेस्टला उपाय सापडला असून या घोटाळय़ाला कारणीभूत ठरलेल्या केएलजी सिस्टेल कंपनीचा मुखवटा बदलण्यात आला असून हे काम टीव्हीएस्टार इंजिनीयरिंग सोल्युशन कंपनीकडे देण्यात आले आहे. 

स्वयंचलित वीज रीडिंगबाबतचा पुरवठा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासह आयव्हीआरएस आधारित कॉल सेंटरची उभारणी करण्याकरिता केएलजी या कं पनीला नोव्हेंबर २00७ मध्ये कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी कंपनीला ५0 कोटी देण्याचे बेस्ट प्रशासनाने मान्य केले होते. त्यापैकी सुमारे ३५ कोटी रुपये कंपनीला आतापर्यंत देण्यात आले आहेत; परंतु केएलजी या कामामध्ये अपयशी ठरल्यामुळे शहरातील सुमारे १0 लाख वीज ग्राहकांना अंदाजित बिले जाऊ लागली. जे वीज कमी वापरतात, त्या ग्राहकांना जादा तर जास्त वीज वापरणार्‍यांना कमी बिल येऊ लागली. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. परिणामी बिल वितरणासही विलंब होऊ लागला.अशातच दोन महिन्यांपूर्वी केएलजी कंपनीची यंत्रणा फोल ठरल्यामुळे बेस्टच्या मोठय़ा ग्राहकांना विजेची बिलेच गेली नाहीत. त्यामुळे बेस्टचे करोडो रुपये ग्राहकांकडेच राहिले आहेत. परिणामी टाटा पॉवरची थकबाकी सुमारे ७५0 कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे टाटाने थेट वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची बेस्टला नोटीस बजावली. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता केएलजीचे कंत्राट समाप्त करून त्याजागी टीव्हीएस्टार इंजिनीयरिंग या कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.या कंपनीची तीन महिन्यांपूर्वी स्थापना झाली असून या कंपनीत केएलजीचेच कर्मचारी काम करीत असल्याचा आरोप मनसेचे बेस्ट समिती सदस्य केदार हुंबाळकर यांनी गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad