मुंबई - भिवंडीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने या भागाला 10 दशलक्ष लिटर जादा पाणी देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे. पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास भिवंडीला जादा पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.
सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळे भिवंडीत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी 20 दशलक्ष लिटर इतके पाणी देण्याची मागणी केली आहे. मात्र, इतके पाणी देता येणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. निदान 10 दशलक्ष लिटर इतके पाणी देता येऊ शकते. त्याला पालिकेच्या गटनेत्यांची मंजुरी मिळाल्यास तातडीने त्यांना जादा पाणी देण्याचा निर्णय घेऊ, अशी माहितीही शेवाळे यांनी दिली. सध्या भिवंडीला 35 दशलक्ष लिटर इतके पाणी दिले जात आहे. त्यात आणखी 10 दशलक्ष लिटर पाण्याची वाढ केली जाणार आहे. पाऊस पडेपर्यंत हे अतिरिक्त पाणी दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment