३६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2013

३६ लाख मतदारांची नावे यादीतून वगळली

नवी दिल्ली : देशात बोगस मतदारांची संख्या वाढली असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारने तब्बल ३६ लाख ६२ हजार मतदारांची नावे निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतून वगळली आहेत. लोकसभेत कायदा व न्यायमंत्री अश्‍विनीकुमार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ८ लाख ४८ हजार ५३८ मतदारांच्या नावांनाही सरकारने कात्री लावली आहे. 

खा. धनंजय सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कायदामंत्री अश्‍विनीकुमार म्हणाले की, देशातील किती पात्र मतदारांची नावे यादीत समाविष्ट नाहीत, याची माहिती देणे कठीण आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५0 च्या तरतुदीमध्ये पात्र मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासंदर्भात विस्ताराने सांगितले आहे. निवडणूक आयोग दरवर्षी मतदार यादीची समीक्षा करीत असते. त्याअंतर्गत विविध कारणांमुळे मतदारांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला जातो. बुथ लेवल अधिकारी यांच्या अहवालानुसार मतदार नोंदणी अधिकारी उचित प्रक्रियांचे पालन करून नावे वगळण्याची कारवाई करीत असतात. १ जानेवारी २0१३ च्या स्थितीनुसार देशभरातील ३६ लाख ६२ हजार नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. सरकारी आकड्यानुसार महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक ८ लाख ४८ हजार ५३८ मतदारांच्या नावांना डच्चू देण्यात आला आहे. त्यानंतर बिहारमधून ५ लाख ६८ हजार १२३, तामिळनाडू ५ लाख ६ हजार ३६१, पश्‍चिम बंगाल २ लाख ३१ हजार ७३४, छत्तीसगड १ लाख ४९ हजार २७१, झारखंड १ लाख ७९१, कर्नाटक १ लाख ७३ हजार ४६0, केरळमधून १ लाख ३८ हजार ७५२, मध्य प्रदेश १ लाख १९ हजार ९१३, पंजाब १ लाख ८ हजार ८१९ आणि उत्तर प्रदेशातून १ लाख १३ हजार ३0 मतदारांच्या नावांना निवडणूक आयोगाने कात्री लावली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad