आघाडी सरकार खाली खेचण्यासाठी रिपाइंचा संकल्प मेळावा - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

10 May 2013

demo-image

आघाडी सरकार खाली खेचण्यासाठी रिपाइंचा संकल्प मेळावा


मुंबई : महागाई, भ्रष्टाचार, झोपडपट्टी, मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास निष्प्रभ ठरलेले आघाडी सरकार उलथून टाकण्याचा संकल्प रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. यासाठी २६ मे रोजी कुर्ला, नेहरूनगर येथे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यात १ लाख लोक सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे.

निवडणुका जवळ आल्या की, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची परंपरा सांगणार्‍या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या राजवटीत दलितांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे. महागाई, भ्रष्टाचाराबरोबरच दुष्काळाने होरपळणार्‍या जनतेला मदत पोहोचवण्यास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. प्राध्यापक, व्यापारी, डॉक्टर आदींचे वारंवार होणारे संप, आंदोलनांमुळे जनता त्रस्त झाली आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नसल्याचे रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कुचकामी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी १ लाख आंबेडकरी जनतेचा संकल्प मेळावा २६ मे रोजी कुर्ला, नेहरूनगर येथील शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती रिपाइं नेते प्रकाश बनसोडे यांनी दिली. हा संकल्प मेळावा यशस्वी करण्यासाठी मुंबईत विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. हा संकल्प मेळावा यशस्वी करण्यासाठी राज्यस्तरावरील रिपाइं कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असल्याची माहितीही या वेळी बनसोडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages