मुंबई : मुंबईत ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत आहेत, मात्र महापौरांचे वाहन विमानतळावर थेट आतपर्यंत सोडणार असाल तरच आपण राष्ट्रपतींच्या स्वागताला हजर राहू, असे पत्र महापौर सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हे पत्र तत्काळ मुख्य सचिवांना धाडण्याचे आदेश त्यांनी पालिका राजशिष्टाचार अधिकार्यांना दिले आहेत.
स्वामी विवेकानंदांच्या १५0 व्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या 'रामकृष्ण मिशन' तर्फे ३१ मे रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. राष्ट्रपतींचे विमानतळावर राजशिष्टाचाराप्रमाणे मुंबईचे महापौर स्वागत करतील, मात्र राष्ट्रपती मुंबईत येतात तेव्हा महापौरांच्या लाल दिव्याच्या गाडीला विमानतळावर थेट आतपर्यंत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे महापौरपदाचा एक प्रकारे हा अपमान आहे म्हणूनच आता महापौर प्रभू यांनी विमानतळावर थेट आतपर्यंत वाहन सोडण्याची मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment