स्पा, मसाज पार्लरसाठी वेगळी परवानगी देण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2013

स्पा, मसाज पार्लरसाठी वेगळी परवानगी देण्याची मागणी

मुंबई : मुंबईतील केशकर्तनालयांना केवळ केस कापण्यासाठी परवानगी असताना अनेक केशकर्तनालयांमध्ये स्पा, मसाज पार्लर तसेच टॅट्यु काढण्याची कामेही केली जातात. यासाठी वेगळी परवानगी आवश्यक असून स्त्री आणि पुरुषांसाठी एकाच ठिकाणी मसाज पार्लर सुरू असतील तेथे पोलीस परवानाही घेण्यात यावा, असे सांगत आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी मंगळवारी आरोग्य समितीत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांच्या ठरावाच्या सूचनेला दिलेले उत्तर परत प्रशासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. डॉ. शुभा राऊळ यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत मुंबईत केशकर्तनालयाच्या नावाखाली मसाज पार्लर चालवत असल्याबाबत गुन्हा नोंदवला होता. मसाज पार्लरमध्ये मोठय़ा प्रमाणात अनैतिक प्रकार घडत असतानाही पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad