सोलापूरच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचे मुंडन आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2013

सोलापूरच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांचे मुंडन आंदोलन



मुंबई : गेल्या १00 दिवसांपासून आझाद मैदानात पाण्यासाठी आंदोलन करत असलेल्या भैया देशमुखांसह इतर शेतकर्‍यांनी मुंडन करून सरकारचा निषेध नोंदवला. अंगावर आसूडाचे फटके मारत घागर मोर्चा मंत्रालयावर नेत मूक मोर्चा काढत सरकारला जाग आणत प्रभाकर ऊर्फ भैया देशमुख यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी आझाद मैदानात मुंडन केले. उजनी धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यात सोडून पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून भैया देशमुख सहकुटुंब आझाद मैदानात आंदोलन करत आहेत; परंतु अद्यापि सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवत भैया देशमुख सरकारचे लक्ष आपल्या आंदोलनाकडे वेधण्याचा प्रयत्न  करत आहेत. दरम्यान, 'एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्‍याने रडल्यासारखे करायचे' असा आघाडीचा खेळ शेतकर्‍यांनी ओळखल्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेचा कौल भयावह असेल, त्यामुळे सरकारने आतातरी गांभीर्याने काम करावे, असे भैया देशमुख म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad