मुंबई : बेस्ट समितीमध्ये असणारे सदस्य बेस्ट विषयींच्या विषयांवर अभ्यास करून त्यावर चर्चा करतात. बेस्ट समितीमध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य आहेत. मनसेने बेस्ट समितीमध्ये आपले अभ्यासु सदस्य पाठवले आहेत; परंतु या अभ्यासु सदस्यांची हुशारीच बेस्ट प्रशासनाने उतरवली आहे. बसपास वितरण यंत्राबद्दल तक्र ार करणार्या मनसे सदस्याला बेस्टने मुद्देसूद उत्तर देऊन पूर्ण अभ्यास करूनच बेस्ट समितीमध्ये प्रश्न उपस्थित करावा, असे अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे. मनसेचे सदस्य केदार हुंबाळकर यांनी १२ मार्चला एका हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे बसपास वितरण यंत्राबाबत तक्रार केली होती. शिवाजी पार्क येथील बसपास वितरण केंद्रावरील यंत्र दिवसातून दोन ते तीन वेळा बंद पडतात. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या १ ते १0 तारखेदरम्यान यंत्र बिघडण्याचे प्रमाण वाढते. ही माहिती आपल्याला तेथील कर्मचार्यांकडून मिळाल्याचे हुंबाळकर यांनी म्हटले होते. हुंबाळकर यांच्या तक्रारवजा आरोपाचे खंडण करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने आपल्या अधिकार्यांना कामाला लावले आणि अवघ्या दोन महिन्यांत उत्तर दिले. बेस्टच्या आतापर्यंतच्या इतिहासात ही पहिलीच वेळ की, फक्त दोन महिन्यांत प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने दिले; परंतु केवळ मनसेचा अतिहुशारपणा स्पष्ट करण्यासाठी प्रशासनाने लवकर उत्तर दिल्याचे बेस्टमध्ये बोलले जात आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांनी अधिकार्यांसोबत शिवाजी पार्कच्या केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांना बसपास वितरणाचे काम व्यवस्थित पार पडत असल्याचे दिसून आले. केवळ १ ते १0 तारखेपर्यंत पास नूतनीकरण करणार्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे संगणक प्रणालीचा वेग मंदावतो, असे येथील कर्मचार्यांनी सांगितले. त्यामुळे या केंद्रावर येणार्या प्रवाशांना पास नूतनीकरणासाठी किती वेळ लागतो, याचा सविस्तर अभ्यास केला गेला. १ एप्रिल रोजी दिवसभरात रांगेत २४९ प्रवासी होते. त्यापैकी १११ प्रवाशांच्या पासचे अवघ्या दोन मिनिटांत नूतनीकरण झाले. ५१ प्रवाशांना ३ ते ५ मिनिटे, ४७ प्रवाशांना ६ ते १0 मिनिटे, ३२ प्रवाशांना ११ ते १५ मिनिटे, ७ प्रवाशांना १६ ते २0 मिनिटे व अवघ्या १ प्रवाशाला अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. या मुद्देसूद उत्तराने हुंबाळकर हैराण झाले. आपल्याला कमी लेखण्यासाठीच प्रशासनाने असे उत्तर दिले का, असे बोलायलाही ते विसरले नाहीत. या वेळी त्यांची बाजू शिवसेना सदस्य सुनील गणाचार्य यांनी सावरून धरली. या वेळी बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी कोणालाही दुखावण्याचा प्रशासनाचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. |
Post Top Ad
23 May 2013
Home
Unlabelled
अभ्यास करून नंतरच प्रश्न विचारा - बेस्ट
अभ्यास करून नंतरच प्रश्न विचारा - बेस्ट
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment