अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या तपासासाठी रिपसेनेचा मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2013

अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या तपासासाठी रिपसेनेचा मोर्चा

नवी मुंबई तळवली येथील ऋषिकेश सोनावणे या अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येप्रकरणी रबाळे पोलिसांकडून योग्य तो तपास होत नसल्याबाबत सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई करून त्यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पोलीस आयुक्तांना निवेदन पत्रदेखील दिले. २0 मे रोजी तळवली येथे राहणार्‍या १३ वर्षीय ऋषिकेशची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख ख्वॉजा मियाँ पटेल यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ऋषिकेशच्या मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर अँट्रॉसिटी अँक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मृत ऋषिकेशच्या आईने अतिरिक्त पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील यांना लेखी निवेदन देऊन मारेकर्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या वेळी फत्तेसिंग पाटील यांनी आपण या प्रकरणी जातीने लक्ष देऊन कठोर कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad