मुंबई : म्हाडाच्या इमारती दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून पावसाळ्यातील धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या अनेक समस्या तसेच अधिकार्यांना उद्भवणारे प्रश्न आणि विविध पर्यायांची चर्चा करण्यासाठी मंडळाचे सभापती प्रसाद लाड मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
मुंबई शहर व बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी म्हाडाने सर्वेक्षण केले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण करून १२ इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र धोकादायक इमारतींमध्ये २ ते ३ इमारती नव्याने दाखल केल्या जातात, तर केवळ २ ते ३ इमारतींवरच कारवाई करण्यात येते. त्यामागे धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींमधील भाडेकरू यांना वारंवार सूचना देऊनही किंवा त्यांच्याशी मालकाशी समन्वय साधूनही ते त्या इमारतींतील आपली घरे सोडण्यास सहसा राजी होत नाहीत. परिणामी, दरम्यानच्या काळात इमारत दुर्घटनाग्रस्त होऊन जीवितहानी होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा भाडेकरूंना त्यांच्या राहत्या घरांच्या आसपास पर्यायी व्यवस्था तात्पुरती किंवा कायमस्वरूपी आणि तेही वेळेत होणे हा पर्याय आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ म्हाडाच्या या कार्यात काही तांत्रिक अडचणी व र्मयादा येतात. त्यामुळे एखाद्या यमदूतासारख्या वाटणार्या अशा अतिधोकादायक इमारतींत रहिवासी डोक्यावर टांगती तलवार घेऊन वास्तव्य करतात. या धोकादायक परिस्थितीतून भाडेकरूंना बाहेर काढण्यासाठी शासनाच्या मजबूत आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे सभापती प्रसाद लाड मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.
No comments:
Post a Comment