मुंबई : भारतीय हवामान विभागाने १५ जून रोजी पावसाचे आगमन होत असल्याचा अंदाज वर्तवला असून राज्य शासनाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व पातळ्यांवर सुसज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथे दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पर्जन्य २0१३ च्या पूर्वतयारीबाबत राज्य व जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सचिव आय. ए. कुंदन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, अग्निशमन यंत्रणेचे संचालक मिलिंद देशमुख, नौदल, हवाई दल, भारतीय हवामान विभाग आदींचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या वर्षी वीज कोसळल्यामुळे होणारे मृत्यू आपल्याला टाळायचे असून विदर्भ व मराठवाडा या भागात अशा घटनांचे प्रमाण जास्त असल्याने वीज पडण्याची संभाव्य ठिकाणे अधोरेखित करण्यात यावीत व त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी करावी. जेणेकरून अतवृष्टी झाल्यास अशा संभाव्य ठिकाणी लोक थांबणार नाही. सुपर कॉम्प्युटरद्वारे अचूक हवामान अंदाज वर्तविण्यासाठी राज्यामध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणात लेप्टो रोगाचा प्रादुर्भाव झाला ही बाब लक्षात घेऊन राज्यात या वर्षी पावसाळ्यात लेप्टो, टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाने आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत समाधानकारक काम केले असून तळेगाव येथे या दलाची तुकडी कार्यरत आहे. आपतजनक परिस्थिती उद्भवल्यास तळेगाव येथून तेथे पोहोचणे जिकरीचे होईल, या दृष्टिकोनातून मुंबईत या दलास जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. ठाणे शहरात ६१ धोकादायक इमारतीतील नागरिकांना येत्या १५ दिवसांत एमएमआरडीएतर्फे देण्यात येणार्या पर्यायी घरात स्थलांतरीत करण्यात यावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. अतवृष्टी झाल्यास नागरिकांना रेल्वे गाड्यांमध्ये याबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी रेल्वेने यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचीत केले.
मनपा यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार - आयुक्त
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे या वेळी झालेल्या सादरीकरणादरम्यान म्हणाले, मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष २४७७७ कार्यरत असून हॉटलाईनद्वारे संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यात येत आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अतिशय प्रभाविपणे कार्यान्वित झाला असून येत्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीवर यशस्वीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. मिठी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण झाले असून ३0 मेपासून खोदाई कामास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी खड्डय़ांची माहिती दिल्यास तत्काळ ते खड्डे बुजविण्याचे प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच १८,७५0 झाडे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कापण्यात आली असून मलेरिया प्रतिबंधासाठी ५ सूत्री कार्यक्रम राबविण्यात आला आहे. मलेरियामुळे होणार्या मृत्यू दरात लक्षणीय घट झाली आहे व या वर्षी मलेरियामुळे एकही मृत्यू होऊ नये असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. डासांची उत्पत्तीच होऊ नये यासाठी प्रत्येक वॉर्डाच्या कानाकोपर्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. पावसाळ्यात वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेऊन पालिकेने रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी केली आहे. अतवृष्टीमुळे साचणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १८0 पंप बसविण्यात आले आहेत, तसेच पालिकेतर्फे राबविण्यात येणार्या मानांकित कार्यप्रणालीची माहितीही त्यांनी दिली.

No comments:
Post a Comment