सुरक्षिततेचा खर्च शासनानेच करायला हवा होता - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2013

सुरक्षिततेचा खर्च शासनानेच करायला हवा होता - उद्धव ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास आम्ही शासनाला सांगितले नव्हते. या कारणास्तव सुरक्षिततेचा खर्चही शासनानेच करायला हवा होता, असे मत शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना या वेळी व्यक्त केले. स्थायी समिती बैठकीत शिवसेनाप्रमुखांवरील अंत्यसंस्काराप्रसंगी सुरक्षिततेसाठी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या पाच लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी येण्यापूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये उलटसुलट वार्ता सुरू झाल्या होत्या. त्यामुळे व्यथित होऊन आपण तातडीने पाच लाखांचा धनादेश पालिकेकडे पाठवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता तो धनादेश पालिकेने आपल्या निधीत जमा करावा, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad