खाजगी सहभागातून सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2013

खाजगी सहभागातून सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य - मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी संस्थेच्या माध्यमातून शासकीय रुग्णालयांमध्ये एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयची सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे काढले. 

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि जीई टेक्नॉलॉजी या अमेरिकन संस्थेच्या संयुक्त भागीदारी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ३५ शासकीय रुग्णालयांमध्ये इमेजिंग विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी हॉटेल ट्रायडंट येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान, जीई कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राईस, जीई कंपनीचे दक्षिण आशिया क्षेत्राचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल आदी या वेळी उपस्थित होते. 

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यामध्ये आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केले जातात. काही रुग्णांना खाजगी क्लिनिक्समध्ये जाऊन एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदी चाचण्या कराव्या लागतात. या चाचण्यांचे दर प्रत्येक ठिकाणी समान नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णाला अशा चाचण्यांसाठी अन्यत्र जावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने शासकीय रुग्णालयांमधील इमेजिंग विभागाचे संयुक्त भागीदारी प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शासकीय रुग्णालयातील रुग्णांना एकाच छताखाली वैद्यकीय चाचण्या मोफत आणि माफक दरात करून मिळण्यासाठी जीई कंपनीबरोबर राज्य शासनाने भागीदारी केली आहे. आरोग्य क्षेत्रात सुरू केलेल्या अनेकविध योजनांचा आढावा घेऊन कुपोषण निर्मूलनाच्या बाबतीतही महाराष्ट्राने यशस्वी वाटचाल सुरू केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad